e4 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वीच्या तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी
e4 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
सरकारी अधिकारी बॅच
पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांसाठी महत्वाची सूचना
काही विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव आम्ही ८वी ते १२वीच्या तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी व आतापासूनच सरकारी अधिकारी कसे होता येते याची तयारी करून घेण्यासाठी आम्ही नवीन बॅच सुरू करण्याचा विचार करत आहोत!
खरे पाहता, आज विद्यार्थी आणि पालक भेडसावणाऱ्या अनेक शैक्षणिक समस्यांमुळे संभ्रमात आहेत!
विशेषतः ग्रामीण भागातील चित्र खुपचं जास्त विदारक आहे! १०वी १२वी नंतर सरकारी नोकरी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खुपचं नगण्य आहे. कारण
ढासळलेली गुणवत्ता व योग्य मार्गदर्शनाचा अभाव!
आता तर शाळेत घेत असलेल्या शिक्षणाचा आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लागणाऱ्या अभ्यासाचा ताळमेळच लागत नाही!
नाहीतर १० वी १२ वी नंतर प्रत्येकाला १००% नोकरी मिळालीच असती.
पण असे नाहीये, दिवसेंदिवस बेरोजगारी, महागाई वाढतच चालली आहे! अनेक तरूण मुले-मुली घरीच बसून आहेत.
आज १०वी, १२वी नंतर लगेच हजारोंच्या संख्येने सरकारी जागा निघत असतात आणि जात पण असतात, कारण आपल्या मुलांना आणि स्वतःला त्याबद्दल काहीच माहिती नसते.
जर आपल्या पाल्याला प्रश्न विचारला की तुला भविष्यात काय बनायचं आहे, तर सांगतात - मला डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस किंवा आर्मी बनायचं आहे, फक्त एव्हढंच..बससस... परंतु यानंतर पुढचं काही माहिती नाही!
की
पोलीस किंवा डॉक्टर बनण्यासाठी कोणती परिक्षा द्यावी लागते, कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो, किती गुणांची परीक्षा असते, किती उंची, वय लागते, पोलीस खात्यात किती व कशा पोस्ट असतात, काय क्वालीफिकेशन लागते, कसा अभ्यास करायचा असतो, इ. अनेक गोष्टी तर माहीतच नसतात आणि कोणी सांगणारे नसल्याने अनेक हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते.
आणि माहिती झालीस तर Graduation नंतर, तीला पण खुप उशीर झालेला असतो मग अशावेळी काय फायदा नसतो! हे माझे स्वतःचे पण अनुभव आहे. तुम्हालाही अनुभव असेलच! जर आपल्याला ७वी, ८वी पासूनच जर योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली असती तर १२वी नंतर कोणती ना कोणती तरी सरकारी नोकरी मिळालेली असती.
पण वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही, पश्चातापाशिवाय!
म्हणून सरकारी नोकरीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन हवे!
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील पालकांना आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर, वकील, बनवण्याची इच्छा तर असते पण एव्हढे महागडे शिक्षण ते मुलांना देऊ शकत नाही, १०-१०, २०-२० लाख रुपये भरू शकत नाही, मग अशावेळी एकच आणि चांगला पर्याय उरतो, तो म्हणजे
स्पर्धा परीक्षा
होय, अगदी परवडणारा, सरकारी नोकरी मिळवून देणारा, मान-प्रतिष्ठा मिळवून देणारा हा एक खरंच उत्तम पर्याय आहे!
परंतु यासाठी मात्र प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची तयारी या गोष्टींची आवश्यकता असते आणि महत्त्वाचे म्हणजे पालकांमध्ये मुलांना घडवण्याची तळमळ, मोठं बनवण्याची धडपड आणि
प्रचंड इच्छा!
मराठी मुले-मुली आता मागे राहता कामा नये. मुलींना ३८% पर्यंत तर मराठा मुलांनाही आता १०% EWS आरक्षण मिळाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी याचा पुर्ण फायदा घेतलाच पाहिजे!
म्हणून तुमच्या पाल्याला आतापासूनच सरकारी अधिकारी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि नॉलेज मिळायला पाहिजे, यासाठी भारत सर व त्यांची टिम सदैव तत्पर आहेत.
भारत सर, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, औरंगाबाद
आदरणीय पालक, जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर सविस्तर माहितीसाठी संपर्क करा
8830913630
तुमच्या पाल्याचे या बॅच मध्ये ॲडमिशन करायचे असेल तरच खालील Click बटन दाबून
नाव नोंदणी करा
(सर्व विद्यार्थी व पालकांना एक विनंती आहे की किमान २० विद्यार्थ्यांची बॅच झाल्यावरच क्लास सुरू करण्याचा आमचा विचार आहे, आपण इच्छुक असाल तर कृपया नाव नोंदणी करावी, ही पोस्ट आपल्या सहकारी मित्रांना पण शेअर करावी, आपल्या क्लासबद्दल माहिती द्यावी जेणेकरून लवकरात लवकर बॅच सुरू होऊ शकते)
e4 मार्गदर्शक शिक्षक
भारत पाटील वाघ, मराठी उद्योजक
e4 सर्विसेस आणि e4 पोस्ट कॉर्नर ब्रॉडकास्टिंग गृप
शिक्षण क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव व स्पर्धा परीक्षा अस्पीरंट आहेत


















